मूळ नक्षत्रावर जन्मलेलं बालक अशुभ असतं का?

मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणावर जन्मलेलं बालक पित्यासाठी, दुसर्‍या चरणावर जन्मलेलं मातेसाठी आणि तिसर्‍या चरणावर जन्मलेलं धनासाठी चांगली फळं देत नाही, असं ग्रंथवचन आहे, मात्र चौथ्या चरणाचा काही दोष नाही. याचबरोबर आश्लेषा नक्षत्राच्या दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या चरणावर जन्मलेलं आणि रेवती व ज्येष्ठा नक्षत्राच्या चौथ्या चरणावर जन्मलेलं बालक शुभ नसतं, असं ग्रंथकार म्हणतात. हा दोष घालवण्यासाठी जप, जाप, होम-हवन, दान, शांतीकर्म आदींचे उपाय ग्रंथकारांनी सुचवले असून त्याची विस्तृत माहिती पुराणग्रंथांत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती