6 राशींच्या लोकांसाठी पुढचे 45 दिवस राहणार आहे फार शुभ, जाणून घ्या त्याचे कारण

गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (11:37 IST)
ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह आपल्या योग्य वेळेतच गोचर करतात. 9 ऑगस्ट रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे. ज्योतिष्यात मंगळाचा गोचर फारच महत्त्वाचा असतो. मंगळ ऊर्जा, अग्नी आणि युद्धाचा प्रतीक आहे. मंगळ 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. मंगळ ग्रह एका राशीत किमान 45 दिवस राहतो. मंगळाचे सिंह राशीत गोचर केल्याने 12 पैकी 6 राशींसाठी येणारे 45 दिवस फारच शुभ आणि मंगलकारी राहणार आहे. तर  जाणून घेऊ कोणत्या आहे त्या 6 रास.
मेष राशी  
आर्थिक संपन्नता येईल. अडकलेले काम पूर्ण होतील. त्याशिवाय नवीन काम सुरू करणे जसे व्यापार किंवा एखादा नवीन प्रोजक्ट मिळण्याची शक्यता आहे. 
कर्क राशी
नवीन मित्र बनतील जे पुढे जाऊन तुमच्या बर्‍याच कामांमध्ये तुमची मदत करतील. त्याशिवाय अतिरिक्त धन प्राप्त होण्याचे संकेत आहे. 
सिंह राशी
परदेश यात्रेचा योग आहे. नोकरी करणार्‍या लोकांसाठी बरीच संधी येईल. कुटुंबातील लोकांचा साथ मिळेल.
तूळ राशी  
मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. या दरम्यान तुमच्याजवळ अशी एखादी संधी येईल जी तुमच्या बढतीत वाढ करवून देईल.
धनू राशी
परिवारातील लोकांचा साथ मिळेल. मानसिक शांतीने पूर्ण वेळ उत्तमरीत्या जाईल. तुमच्यासाठी हा वेळ उपयुक्त आहे. मंगळाचा सिंह राशीत गोचर लाभकारी राहणार आहे.
कुंभ राशी  
अतिरिक्त धन प्राप्तीची संधी आपणास मिळणार आहे. मान प्रतिष्ठेत वाढ होईल. मित्रांचा साथ मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती