Gifts देण्याचा आणि घेण्याचा ग्रहांवर परिणाम होतो

गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:37 IST)
मित्रांना आणि नातेवाइकांना भेटवस्तू देण्याच्या पूर्वी आपण त्यांची आवड आणि आपल्या बजेट कडे बघतो. पण आपल्याला माहित आहे का, की आपण कोणाला दिलेली भेटवस्तू आपल्याला दारिद्र किंवा श्रीमंत बनवू शकते. आपणास वाचून आश्चर्य होणार, पण हे खरे आहेत की फारच कमी लोक हे जाणतात की आपण लोकांना दिलेल्या भेटवस्तू किंवा घेतलेल्या भेटवस्तू आपल्या ग्रहांवर प्रभाव करतात. 
 
जेव्हा एखादा व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीला काही दान देतो  तर त्यामागचा विश्वास असा असतो की अशुभ फळ देणाऱ्या ग्रहांशी निगडित त्या वस्तुंना दान द्यावे जेणे करून त्या ग्रहाची अशुभता कमी व्हावी. पण जर आपण अजाणता शुभ फळ देणारे ग्रहांशी निगडित काही वस्तू दान किंवा भेटवस्तू देतो तर शुभ ग्रहांच्या शुभतेत देखील कमी येते. या मुळे शुभ ग्रह त्या वर्षी व्यक्तीला अपेक्षित फळ देत नाही. तज्ज्ञांच्या मते, जाणून घेऊ या की कुंडलीत कोणते ग्रह बळकट झाल्याने कोणती वस्तू दान किंवा भेटवस्तू म्हणून देऊ नये.
 
सूर्य- तज्ज्ञाच्या मते, आपल्या पत्रिकेत सूर्य चांगल्या स्थिती मध्ये असल्यास तांब्याने बनलेली वस्तू, माणिक, प्राचीन महत्त्व असलेल्या वस्तू, विज्ञानाशी निगडित वस्तू घेणे योग्य मानले आहे. जर पत्रिकेत सूर्य खालचा आहे किंवा अशुभ स्थितीत आहे तर ह्या सर्व वस्तू भेटवस्तू म्हणून देणं चांगले मानले आहे. असं केले नाही तर पदोन्नतीमध्ये अडथळा, वडिलांना त्रास संभवतो. 
 
चंद्र- चांदीने बनलेल्या वस्तू, तांदूळ, शिंपल्या मोती, या सर्व वस्तू चंद्रमाचे घटक आहे. या सर्व वस्तू पत्रिकेत चंद्रमा खराब असल्यास दुसऱ्यांना भेट द्यावी घेऊ नये. हे सर्व वस्तू तेव्हाच घ्यावा ज्यावेळी पत्रिकेत चंद्र चांगल्या स्थितीत असेल अन्यथा घरात कलह, काळजी, धावपळ, होऊ शकते.
 
मंगळ - पत्रिकेत मंगळ खराब स्थिती मध्ये असेल तर कोणाकडून देखील मिठाई स्वीकारू नये. तर या परिस्थितीत मिठाईचा डबा दुसऱ्याला देण्यास संकोच अजिबात करू नये. 
 
बुध- जर कुंडलीत बुधाची स्थिती खराब आहे तर कोणालाही पेन, खेळणी, क्रीडावस्तू देऊ नये. असं केल्याने व्यवसायात किंवा लहान बहिणीला त्रास संभवतो. पत्रिकेत बुध चांगल्या स्थितीत असेल तर या सर्व वस्तुंना घेण्यात संकोच करू नये.
 
गुरु- तज्ज्ञ सांगतात की जर आपण गुरु ग्रहाची स्थिती चांगली करू इच्छिता तर लोकांना धार्मिक पुस्तक, सोन्याचे दागिने, पिवळे कपडे, केशर इत्यादींचे दान करावे. पण गुरु चांगल्या स्थिती मध्ये असून शुभ फळ देणारे आहे तर या वस्तूंचे दान दिल्याने गुरूच्या चांगल्या फळात कमी येऊ शकते. ज्यामुळे पैशाचा अभाव, व्यवसाय किंवा सरकारी सेवेत प्रगतीत अडथळा येऊ शकतो.
 
शुक्र- तज्ज्ञ सांगतात, की सुवासिक द्रव्य, रेशीम कापड, चार चाकी वाहन, सुख आणि भौतिक वस्तू, स्त्रियांच्या कामात उपयोगी येणाऱ्या वस्तू हे सर्व शुक्राचे घटक मानले आहे. शुक्र पत्रिकेत खराब स्थिती मध्ये असल्यास हे वस्तू वाटून द्या पण आपल्याकडे घेऊ नका. असं केल्याने व्यक्तीला अकारण बायकांपासून त्रास, द्वेष, मूत्ररोगाला कारणीभूत देखील असू शकतात.
 
शनी- जर पत्रिकेत शनीची स्थिती अशुभ किंवा खराब असल्यास समारंभात मद्यपान देणे टाळा. पण शनी चांगला आहे तर अशा समारंभात जावे पण स्वतः असे  समारंभ आयोजित करू नये.
 
राहू - विद्युत उपकरणे,कार्बन, औषधे, या सर्व वस्तूंचा संबंध राहू शी आहे.
 
केतू - ब्लँकेट, जोडे, चपला, सुरी, मासे, या सर्व वस्तू केतूशी निगडित आहेत. 
उलट व्यवहार झाल्यास माणसाला कानाचे आजार, पायाला दुखापत, आणि मुलाला वेदना होण्याचे कारण होऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती