गणपतीला विडा अर्पित करा आणि चमत्कार बघा

सनातन परंपरेनुसार सर्व प्रकाराच्या संस्कार आणि देवी देवतांची साधना करताना विड्याची पान वापरलं जातं. सुख-समृद्धीसाठी याचे अत्यंत महत्तव आहे. तसेच बुधवार हा वार गणपती आराधनासाठी सर्वोत्त्म शुभ दिन मानला गेला आहे. अशात विड्याच्या पानाचा उपाय करुन प्रत्येक समस्यापासून सुटकारा मिळवता येऊ शकतो. गणपतीच्या कृपेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
 
या प्रकारे अपिर्त करावा विडा
गणपती सर्व संकट हरणारा देव आहे. गणपतीच्या पूजेत विडा वापरणे सर्व प्रकाराची सिद्धी प्रदान करणारे मानले गेले आहे. जर खूप प्रयत्न करुन देखील कामात यश मिळत नसेल तर बुधवारी गणपती मंदिरात विड्याच्या पानासह सुपारी आणि वेलची अर्पित करावी. निश्चितच सर्व अडथळे दूर होतील आणि आपलं काम पूर्ण होईल. तसेच दांपत्य जीवनात गोडावा टिकून राहावा म्हणून गणपतीला गोड विड्याच पान अर्पित करावं.
 
या उपायामुळे मिळेल नोकरी
जर खूप प्रयत्न करुन देखील नोकरी-व्यवसायात यश मिळत नसेल तर आपण एक विड्याचं पान खिशास ठेवून घरातून निघावे. हा उपाय केल्याने निश्चितच कामात यश मिळेल. हा उपाय बुधवार पासून सुरु करावा. तसेच बुधवारी विड्याचं पान खाल्ल्याने आत्मविश्वासात देखील वाढ होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती