आपल्या माहीत नसतील कुत्र्याबद्दल या 8 शुभ - अशुभ गोष्टी

ज्योतिषीनुसार कुत्रा केतूचा प्रतीक आहे. कुत्रा पाळल्याने किंवा कुत्र्याची सेवा करण्याने केतूचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो.
कुत्र्याचा भुंकणे किंवा रडणे अशुभ मानले गेले आहे. हे नकारात्मक वातावरण असल्याचे कारण आहे.
कुत्रा घराच्या चारी बाजूला फिरताना आवाज काढत असल्यास अशुभ मानले गेले आहे. 
सूत्र ग्रंथात श्वानाला अपवित्र मानले गेले आहे. याच्या स्पर्श व दृष्टीमुळे भोजन अपवित्र होतं. श्वान यम संबंधित असणे याचे कारण मानले गेले आहे.
शुभ कार्यात कुत्रं अडथळे घालत असल्यास विषमता आणि अनिश्चितता प्रकट होते.
कुत्र्याला दररोज खाऊ घातल्याने शत्रू भय नाहीसं होत आणि निडरता येते.
संतान प्राप्तीसाठी काळं कुत्रं पाळणे शुभ ठरतं.
कुत्रं पाळल्याने घरात लक्ष्मी येते आणि कुटुंबातील सदस्यांवरील आजार कुत्रं स्वत:वर घेतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती