ग्रह मंत्र जपा, दोष दूर करुन सुख मिळवा

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:42 IST)
राहू मंत्र
ऊँ राहवे नम:
हा मंत्र जपल्याने मानसिक ताण दूर होतो. वाद मिटतो. आ‍ध्यात्मिक सुख प्राप्ती होते.
 
केतु मंत्र
ऊँ केतवे नम:
या मंत्राचा जाप केल्याने नात्यातील ताण दूर होतात आणि सुख-शांती मिळते.
 
शनी मंत्र
ऊँ शनैश्चराय नम:
हे मंत्र तन, मन, धन निगडित समस्यांपासून मुक्ती देतं. भाग्य लाभतं.
 
शुक्र मंत्र
ऊँ शुक्राय नम:
हे मंत्र जपल्याने दांपत्य जीवनात सुख येते. दांपत्य जीवनातील ताण आणि कलह दूर होतात.
 
गुरु मंत्र
ऊँ बृहस्पतये नम:
या मंत्राचा जप केल्याने सुखद दांपत्य जीवन, आजीविका आणि सौभाग्य प्राप्ती होते.
 
बुध मंत्र
ऊँ बुधाय नम:
हे मंत्र जपल्याने बुद्धी आणि धनलाभ प्राप्ती होते. घर किंवा व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होऊन निर्णय क्षमता वाढते.
 
मंगळ मंत्र
ऊँ भौमाय नम:
या मंत्राचा जप केल्याने भूमी, संपत्ती आणि विवाह अडचणी दूर होतात आणि सांसारिक सुख प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती