डिप्रेशन देऊ शकतो पांढरा मोती, जाणून घ्या कधी धारण करावा कधी नाही

रत्न विज्ञानामध्ये मोती अत्यंत महत्त्वाचा असतो. गोल लांब आकाराचा मोती, ज्याचा रंग तेजस्वी पांढरा असेल आणि त्यात लाल रंगाच्या ध्वजाच्या आकाराचा सूक्ष्म चिह्न असल्यास तो धारण करणार्‍या व्यक्तीला राज्याकडून लक्ष्मीचा लाभ होतो.
 
तसं तर चंद्र क्षीण झाल्यावर मोती घालण्याचा सल्ला दिला जातो परंतू प्रत्येक लग्न साठी हे योग्य नाही. असे लग्न ज्यात चंद्र शुभ स्थानाचा (केंद्र किंवा त्रिकोण) स्वामी होऊन निर्बल असेल, अशातच मोती धारण करणे फायद्याचे ठरेल. नाहीतर मोती भयानक डिप्रेशन, निराशावाद आणि आत्महत्येचा कारक बनू शकतो. जाणून घ्या लग्न कुंडलीनुसार केव्हा धारण करावा मोती...
 
लग्न कुंडलीत चंद्र शुभ स्थानांचा स्थायी असेल पण,
 
1. 6, 8, किंवा 12 भाव यात चंद्र असल्यास मोती धारण करावा.
 
2. नीच राशी (वृश्चिक) मध्ये असल्यास मोती घालावा.
 
3. चंद्र राहू किंवा केतूची युतीमध्ये असल्यास मोती धारण करावा.
 
4. चंद्र पाप ग्रहांच्या दृष्टी असल्यास मोती घालावा.
 
5. चंद्र क्षीण असल्यास किंवा सूर्यासोबत असल्यास मोती धारण करावा.
 
6. चंद्राची महादशा असल्यास मोती अवश्य धारण करावा.
 
7. चंद्र क्षीण असल्यास कृष्ण पक्षाचा जन्म असल्यास देखील मोती धारण केल्याने लाभ मिळतो.
 
मोतीबद्दल विशेष गोष्टी  -
 
रत्न 84 प्रकाराचे असतात. त्यात मोती आपलं विशेष महत्त्व दर्शवतो. चंद्राच्या बली असल्यामुळे केवळ मानसिक ताणापासून मुक्ती मिळत नसून अनेक आजार जसे मूतखडा, मूत्रमार्गाचा रोग, सांधे दुखी इतर आजारापासून देखील मुक्ती मिळते.
 
जर चंद्र लग्न कुंडलीत अशुभ होऊन शुभ स्थानांना प्रभावित करत असेल तर अशा स्थितीमध्ये मोती धारण करू नये. अशात पांढर्‍या वस्तू दान कराव्या. महादेवाची पूजा- अभिषेक करावं. हातात पांढरा दोरा बांधावा आणि चांदीच्या ग्लासात पाणी प्यावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती