पती-पत्नीमध्ये होत असतील भांडण तर वाचा हे मंत्र

वैवाहिक जीवनातील मतभेद दूर करेल मंत्र


 
 
 
लग्नानंतर कित्येक पती-पत्नीमध्ये सुरुवातीला मधुर संबंध असतात पण काही दिवसाने आपसात मतभेद व गैरसमज वाढू लागतात आणि भांडण व्हायची वेळ येते. अश्या परिस्थित घरात कलह निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनात कडूपणा येतो. जर आपल्या जीवनात अशी स्थिती निर्मित होत असेल तर हे उपाय करून समस्यावर मात करू शकता. 
 
1. पती-पत्नीमध्ये अतिशय कलह असल्यास:
पहाटे उठून अंघोळ करा. यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर पाणी वाहत श्रद्धापूर्वक या मंत्राचा जप करा: 
ओम् नम: संभवाय च मयो भवाय च नम:
शंकराय च मयस्कराय च नम: शिवाय च शिवतराय च।।
2. पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर:
 
सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर एखाद्या एकांत जागेवर आसन मांडावे. आता त्या आसनावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर देवी पार्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. श्रद्धापूर्वक 21 वेळा या मंत्राचा जप करावा:  

अक्ष्यौ नौ मधुसंकाशे अनीकं नौ समंजनम्।
अंत: कृणुष्व मां ह्रदि मन इन्नौ सहासति।।
3. वैवाहिक सुखांच्या प्राप्तीसाठी:
 
सकाळी अंघोळ करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावावा. उदबत्ती लावून फुलं चढवावे. यानंतर या मंत्राचा 108 वेळा जप करावा: 

धां धीं धूं धूर्जटे: पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी 
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरू।।
 
ज्योतिषानुसार या मंत्राद्वारे शीघ्र परिणाम प्राप्त होतात आणि जीवनात सुख प्राप्त होतं.

वेबदुनिया वर वाचा