जाणून घ्या अंग फडफडण्याचा अर्थ

वरचे ओठ फडफडणे: प्रिय भोजन मिळेल
खालचे ओठ फडफडणे: प्रियकराकडून सुख मिळेल

ओठांची उजवी बाजू फडफडणे: अचानक धन लाभ योग
ओठांची डावी बाजू फडफडणे: ‍आवडती वस्तू हरवू शकते

दोन्ही ओठ फडफडणे: भाग्य उजळतं आणि धन प्राप्ती होते
 
गळा फडफडणे: शुभ शकुन. अशा लोकांचा मान-सन्मान वाढतो. समाजात प्रसिद्धी मिळेल
 

उजवीकडील पापणी फडफडणे: शारीरिक कष्ट होऊ शकतं
तोंड फडफडणे: अपत्याकडून शुभ समाचार मिळतो

उजवा डोळा किंवा भुवया फडफडणे: विशेष इच्छा पूर्ण होते
डावा डोळा किंवा भुवया फडफडणे: शुभ समाचार मिळतो

दोन्ही भुवयांच्यामध्ये फडफडणे: सुख सुविधा लाभते. हाताने उत्तम कामगिरी घडते
डोकं फडफडणे: यश आणि सुख समुद्धी लाभते

दोन्ही गाल फडफडणे: धन प्राप्ती होते
उजवी बाजूचा गाल, खांदा, कंबर फडफडणे: धन लाभ

डावी मांडी फडफडणे: अपमानित होऊ शकता
उजवी मांडी फडफडणे: धन लाभ होतो

उजवा तळपाय फडफडणे: कठीण परिस्थितीला सामोरा जावं लागेल
डावा तळपाय फडफडणे: यात्रा योग
 

वेबदुनिया वर वाचा