-उगवताना आणि मावळताना सूर्य मोठा का दिसतो असं का?

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:35 IST)
बऱ्याच वेळा आपण असे बघितले आहे की जेव्हा सूर्यास्त होतो किंवा सूर्य उगवतो तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो  असं का 
सूर्य हा पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे, सूर्य सौर मंडळाचा एक मोठा पिंड आहे आणि त्याचा व्यास सुमारे 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे. जो आपल्या पृथ्वीपेक्षा 109 पटीने जास्त आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 .3 सेकंद लागतात. 
 
खरं तर जेव्हा सूर्य उगवतो आणि मावळतो त्यावेळी त्याच्या किरणा कमी दिसतात त्यामुळे सूर्य पूर्ण दिसतो. जेव्हा सूर्याचा प्रकाश पूर्ण असतो तेव्हा तो पूर्ण दिसत नाही त्यावेळी त्याचा मध्य भाग दिसतो 
आणि म्हणून तो आकारात लहान दिसतो. हेच कारण आहे की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचा आकार मोठा दिसतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती