वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी

पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
 
पूजन विधी:-
 
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा.  
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.  
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.  
नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.  
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.  
हे मंत्र म्हणावे- 
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
 
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.  
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती