दागिने नवे आणि चकचकीत दिसतील, या प्रकारे घ्या काळजी

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (15:06 IST)
दागिने बायकांना फार आवडतात. आपल्या प्रत्येक ड्रेससोबत घातल्या जाणार्‍या दागिन्यांची बायका काळजी घेतात. दागिन्यात फक्त सोने, चांदी, हिरे, रत्नच असे नाही तर ऑक्सिडाइझ केलेले दागिने देखील खूप आकर्षक वाटतात. बायका, मुली अशातील दागिने देखील अत्यंत आवडीने घालतात. 

आता प्रश्न आहे की आपण आपल्या एवढ्या आवडीच्या वस्तूची काळजी कशी घेता ? कधी याचा विचार केला आहेस का. जर आपण दागिन्यांचे लक्ष व्यवस्थितरित्या ठेवले नाहीस तर ते वेळेनुसार काळे पडतात आणि फिकट होऊ लागतात. आपणास इच्छा असल्यास की आपल्या दागिन्यांची चकाकी तशीच राहावी, त्यासाठी आपल्याला या काही टिप्सचे अनुसरणं करणं आवश्यक आहे.
 
* दागिन्यांची चकाकी तशीच ठेवायची असल्यास, क्लोरीनच्या पाण्यापासून याला दूर ठेवावं. जर आपण स्विमिंग पुलात जात असाल किंवा घराचे काम जसे की भांडे घासणं, कपडे धुणं सारखे काम अंगठी घालून करत असाल, तर ती हळू हळू काळी पडते. तसेच जर आपण ऑक्सिडाइझ केलेले दागिने घातलेले असल्यास तर क्लोरीनचे पाणी हानिकारक ठरू शकतं. म्हणून याचा सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या. जेणे करून याची चमक नवीन सारखी बनून राहील.
 
* आपले दागिने व्यवस्थित ठेवायचे असल्यास, तर त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. कारण धूळ -माती, जिवाणू, प्रदूषणामुळे ती काळी पडते. म्हणून याला आठवड्याच्या आधारे स्वच्छ करावी. आपली इच्छा असल्यास याला कोमट पाण्यात साबणाचा घोळ बनवून या घोळाने स्वच्छ करू शकता. या व्यतिरिक्त मिठाचे टूथपेस्ट देखील आपण लावू शकता. पण लक्षात असू द्या की हे दागिने हळुवार हाताने स्वच्छ करायचे असतात.
 
* नेहमी मेकअप आधी करा नंतर दागिने घाला. बऱ्याच बायकांची सवय असल्यास की ते दररोज जे दागिने घालतात, ते घालूनच मेकअप करतात असे केल्यास त्याचा वर हळू-हळू मेकअप जमू लागतं आणि दागिन्यांची चकाकी कमी होऊ लागते. म्हणून हे लक्षात ठेवावं की मेकअप करताना दागिने घालू नये. तर त्याचा नंतर घालावे.
 
* आपल्याला दागिने काळे होण्यापासून वाचवायचे असल्यास त्यांना व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवावं की दागिने कापसात गुंडाळून वेग-वेगळ्या डब्यात ठेवावेत. असे केल्यास मॉइश्चरायझर आणि हवा दागिन्यात जाणार नाही. प्रत्येक दागिना वेगळा ठेवल्यास तर ते अधिक उपयुक्त ठरणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती