करीश्माचा "कुल समर लुक"

सोमवार, 9 एप्रिल 2018 (15:47 IST)
उन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची असते की उन्हामुळे आपल्या त्वचेचे नुकसान न व्हावे, आणि त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतो. उन्हाळ्यात वापरण्यासाठी खास कपडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत. "समर फॅशन" आता सगळीच तरुणाई फॉलो करताना दिसते, यंगस्टर्स खासकरून सेलिब्रिटीजला फॉलो करताना दिसतात.
आपला फेव्हरेट स्टार आपल्या सोशल मीडियावर काय अपडेट करतो याकडे सर्वांचेच लक्ष असते. बॉलिवूडमध्ये सर्वांची फेव्हरेट करिश्मा सध्या तिच्या समर लूकमुळे जास्तच चर्चेमध्ये आहे. आपल्या फ्रेंड्स सोबत बाहेर जात असताना सफेद आणि पॉकेट स्कर्ट मॅक्सि अशा हटके कॉम्बिनेशन असलेला लूक केला आहे. डिझायनर इशा अमीन यांनी डिझाईन केलेला "लिवा" च्या स्पेशल समर लूकमध्ये करिश्मा एकदम कुल दिसत होती. या लूक ला नेटिझन्सने चांगली पसंती दिलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती