फॅशन टिप्स : अशा प्रकारे साडी नेसल्यास उंच दिसाल, स्थूलपणा दिसणार नाही

शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (12:17 IST)
साडी नेसल्यावर प्रत्येक महिला छान दिसते. बऱ्याच  महिला साडी नेसत नाही कारण त्यांना अस वाटते की साडी नेसल्यावर त्यांची ऊंची कमी दिसेल  किंवा साडीमध्ये त्या स्थूल दिसतील. यामुळे त्या साडी नेसायला घाबरतात. जर तुम्ही पण साडी नेसल्या नंतर तुम्हाला तुमची ऊंची कमी वाटत असेल तर किंवा साडीमध्ये तुम्हीही स्थूल वाटत असाल तर जाणून घ्या या सोप्या स्टायलिंग टिप्स ज्या तुमच्या साडी लुकला परफेक्ट बनवतील. 
 
लांब रेषा असलेली डिझाइनची साडी नेसा 
साडीमध्ये ऊंची जास्त दिसावी असे वाटत असेल तर अशी साडी नेसा  ज्या मध्ये  वरून खाली लांब रेशा  असलेली डिझाइन असेल. अशा प्रकारच्या साडीत  तुमची ऊंची जास्त दिसेल. जर साडीची डिझाइन रुंदीत रेषा असलेल्या डिझाईनची आहे  तर अशा साडी परिधान करू नये अशा साडी मध्ये तुमची ऊंची कमी तर दिसेल पण तुम्ही स्थूल पण दिसाल. तसेच साडी नेसतांना ती नाभीच्या खाली नेसावी नाभीच्यावर साडी नेसल्यास लुक स्थूल दिसतो यासाठी साडी नेसतांना या सोप्या ट्रिक साडी लुक मध्ये  बारीक दिसायला मदत करतात. 
 
साडीच्या प्रिंट्सवर लक्ष ठेवणे 
साडीचे प्रिंट्स तुमच्या बॉडीच्या शेपनुसार असावे. छोट्या प्रिंटची साडी किंवा फ्लोरल प्रिंटची साडी पण परिधान करू शकता. अशा प्रकारच्या साडीमध्ये तुमची ऊंची जास्त दिसेल सोबतच स्थूलपणा पण कमी दिसेल 
 
ब्लाउजच्या  डिझाइन वर लक्ष देणे 
जर तुम्ही साडीत ऊँच दिसू इच्छिता तर लांब किंवा फूल स्लीव्स असलेले ब्लाउज घालावे. असे ब्लाउज कॅरी करा जे बिना स्लीव्सवाले असतील किंवा हाताच्या कोपरच्या वरती असतील. बाह्यांवर अधिक चर्बी असेल  किंवा स्थूलपणा असेल तर कट स्लीव्स, हाफ स्लीव्स असलेले ब्लाउज परिधान करू नये .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती