बेरोजगार तरुणांचे होणार स्वप्न पूर्ण दीड लाख पदांची होणार भारती, वाचा कोणी केली घोषणा

शुक्रवार, 21 जून 2019 (10:32 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वातवरणात फार मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आगोदर 72 हजार पदं भरण्याचं जाहीर केले होते, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी  प्रक्रिया सुरु असल्याने अधिक माहिती राज्य सरकार लवकरच प्रसिद्ध करणार आहे. 
 
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र नोकरीची जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची घोर निराशा होते, तर दुसरीकडे अनेकांचे वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा होत नाही, मात्र या घोषणेमुळे अनेकांच्या सरकारी नोकरीच्या इच्छा जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे सरकार लवकरच घोषणा करणार असून  अनेक तरुणांना योग्य ते काम मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती