राज्य सहकारी बँकेच्या मुंबई शाखेत भरती

रविवार, 1 मार्च 2020 (12:27 IST)
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत (MSCB) मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे क्लर्क पदासाठी रिक्त जागा अधिक आहेत. एकूण 164 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अन्य पदे कनिष्ठ अधिकारी पद ग्रेड 2 ची आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 मार्च 2020 आहे. कोणकोणती पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यांची माहिती घेऊ -
 
पदाचे नाव - क्लर्क
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी
नोकरीचे स्थान - मुंबई
रिक्त जागा - 103
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 मार्च 2020
 
पदाचे नाव - ज्युनिअर ऑफिसर
शैक्षणिक पात्रता -कोणतही शाखेतील पदवी, बी.टेक./ बी.ई.,एसीए
नोकरीचे स्थान - मुंबई
रिक्त जागा - 12
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 मार्च 2020
 
पदाचे नाव - ऑफिसर ग्रेड - 2
शैक्षणिक पात्रता - बी.टेक./ बी.ई., कोणतही शाखेतील पदवी
नोकरीचे स्थान - मुंबई
रिक्त जागा - 47
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 मार्च 2020
 
पदाचे नाव - संयुक्त व्यवस्थापक 
शैक्षणिक पात्रता - बी.टेक./ बी.ई., एसीए
नोकरीचे स्थान - मुंबई
रिक्त जागा - 02
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 मार्च 2020
 
वयोमर्यादा विविध पदांसाठी 21 ते 40 वर्षे आहे. क्लर्क पदासाठी घेण्यात येणार्‍या फ्रेशर्सना मासिक 30 हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे.
 
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती