MMRC मध्ये भरती, २१ जानेवारी अंतिम तारीख

गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:01 IST)
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये तंत्रज्ञ, अभियंता यांच्यासह अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२१ आहे. आपण ऑनलाइन अर्ज करु शकता. इच्छुक उमेदवार mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 
 
पुणे रेल्वे प्रकल्पांतर्गत विविध पदांवर भरतीसाठी दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. टेक्निशियनसाठी दहावी पास अर्ज करू शकतात. 
 
तंत्रज्ञ पदांवर दरमहा २०,००० ते ६०,००० पगार मिळेल, तर स्टेशन कंट्रोलरच्या पदासाठी दरमहा ३३ हजार ते १ लाख पगार मिळेल. याशिवाय विभाग अभियंता पदासाठी दरमहा वेतन ४० हजार ते १.२५ लाख रुपये असेल.
 
या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
 
इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mahametro.org च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती