भारतीय वायुदलात विविध पदांवर भरती

शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
Indian Air Force मध्ये ग्रुप सी च्या अनेक असैनिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधरांपर्यंत नोकरीची संधी आहे. ही भरती वायु सेनेच्या साउथ वेस्टर्न एयर कमांड हेडक्वार्टर अंतर्गत होणार असून अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज साठी माहिती वाचा.
 
पदांची तपशील
एकूण पदे - २५५
मल्टी-टास्किंग स्टाफ, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, एलडीसी, क्लर्क हिन्दी टायपिस्ट, स्टेनोग्राफर ग्रेड-2, स्टोर सुपरीटेंडेंट, स्टोरकीपर, लॉन्ड्रीमॅन, वार्ड सहायिका, कुक, फायरमन
 
पात्रता
वेगवेगळया पदांनुसार आवश्य शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर पर्यंत अर्ज करु शकतात.
 
वयोमर्यादा
सर्वसाधारण प्रवर्गासाठी : १८ वर्षे ते २५ वर्षे 
ओबीसी वर्गासाठी: वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत
एससी, एसटी प्रवर्गासाठी: वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत
दिव्यांगांसाठी : कमाल वयोमर्यादेत १० वर्षांची सवलत
विभागीय कर्मचारी, विधवा, घटस्फोटित महिलांसाठी देखील कमाल वयोमर्यादेत सवलतीचा लाभ.
 
या प्रकारे करा अर्ज
भारतीय वायुसेनेच्या या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. नोटिफिकेशनसोबत देण्यात आलेलं अर्ज संपूर्ण भरून पाकिटात भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. पाकिटावर दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प लावून कोणत्या पदासाठी कोणत्या प्रवर्गात अर्ज केला आहे, त्याची माहिती ठळकपणे नमूद करावी लागेल. अर्ज १३ मार्च २०२१ पर्यंत पोहचावा याची खात्री करावी.
 
निवड प्रक्रिया
अर्ज शॉर्टलिस्टि झाल्यावर लेखी परीक्षा होईल. यात योग्यता प्राप्त उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार टेस्ट द्यावी लागेल.
indianairforce.nic.in

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती