या वळणावर......

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (13:27 IST)
बाबा माझे शूज लहान झालेत मला, चालायला त्रास होतो..
इति teenager चिरंजीव 
अरे मग माझे घाल नं..नाहीतरी मला रोज सोर्ट्स शूज लागतंच नाहीत....नको मला नवीनच घेवुन द्या तुमचे पण लहान होतात आता..
अरे बाप रे..पूर्वी वडिलांच्या आणि मुलाच्या वहाणांचे माप एक झाले की मुलाला मित्र समजावे असे म्हणत..आणि तो खराही आहे.
पण ह्या वयातल्या प्रगल्भतेचं काय ?
कारण लहानपणी बाबा म्हणजे सगळ्यात मोठा हीरो असतात. ज्यांच्याकडे  जगातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे असतात. त्यांना जादू येते, ते आपल्याला जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात भुर्रकन नेवू शकतात अशी त्यांची प्रतिमा....
 
आई मात्र कधी दादा पूता करत, तर कधी शिस्त लावत मोठा करत असते. कितीही मोठा झाला तरी तिला आपलं बाळ हे 'आपला तो बाब्याच असतो'.
बाबांचा धाक असतो पण गट्टी ही आईशीच बरं का..
लहानपणी सर्वस्व असलेली आई teenage मध्ये काहीशी दुरावू लागते. पण काही गुपित असेल, काही demand असेल, कुठल्याही गोष्टीचा राग काढायचा असेल, काही गुपित सांगायचे असेल, बाबांशी संगनमत करून आईची टिंगल टवाळी असेल तर हक्काची आई आहेच. 
आई बद्दल काही काही मते ठाम. आई प्लीज़ असा ड्रेस नको घालू, आई प्लीज़ जास्त प्रश्न नको विचारू, आई प्लीज़ मित्रांसमोर मला टोपण नावाने आवाज नको देऊ...आई तुझा ड्रेस सेंस..My God...
कुठे फंक्शन ला गेले असता तू किती बोलत बसते सगळ्यांशी म्हणून मी कुठे येत नाही, अश्या तक्रारी कायम..
आता बाबांशी महत्वाच्या बाबींबद्दल चर्चा रंगते जसे क्रिकेट, फुटबॉल, ट्रेंड्स, न्यू मोबाईल व्हर्जन etc.etc.
असं हे मुलांचं टीनएज पालकांना काहीसं सम्भ्रमात टाकणारं.
बाबा दूरस्थ परंतु आदरणीय कुठेतरी उच्च स्थानावर बसविलेले.
हळूहळू सगळे बदलत जाते. हे वळण वळसे घेत पुढे जाते. Maturity येते.
समोर करीयर, नवी स्वप्ने, रंगीबेरंगी वाटा खुणावत असतात. एका नव्या दिशेने वाटचाल सुरू होते.
आईवडील म्हणत असतात
तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा...मेरा साया....

By स्नेहल खंडागळे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती