पिंपळपान

बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (12:36 IST)
खरं तर तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला या पिंपळपानाविषीय उत्सुकता असतेच! या पिंपळपानावर कैकजनांचे इतके प्रेम असते की ते आपल्या वहीत-पुस्तकात किंवा रोजनिशीत कित्येक दिवस जपूनही ठेवतात! आयुष्याच्या पहिल्या कोवळ्या वाटेवरचं पहिलं-वहिलं कोवळं पिंपळपान अगदी जिवाशी नातं जोडणारं असतं!
 
पिंपळ हा कल्पवृक्ष असून तो प्रत्येकाला काही ना काही तरी देतच असतो! एखाद्या घरातल कर्त्या पुरुषासमान!... आणि तो भासतोही तसाच. याचा आणि शाळेचा काय त्या देवानं रेशमी धागा जोडला कुणास ठाऊक पण.. हा अगदी    भूमिपूजनापासून त्या शाळेच्या आवारात न सांगता येतो! याला कोणी निरोप देत नाही की याची कोणाला आठवण होत नाही. पण ... हा तेथे हजर होतो! कधी मला याला 'निलट'च म्हणावसं वाटतं!... किंवा गेल्या जन्मीचा एखादा पिसाटलेला शिक्षक.....!
 
दगडांवर घाव घालून, शाळेची इमारत बांधली जाते ती यच्याच छायेत बसून! दमलेल्या कामगारांना हाच थंड वारा घालतो! संस्थापकानेसुद्धा पहिला वर्ग जमविलेला मी कित्येक वेळा याच कल्पवृक्षाच्या छायेत पाहिलाय! हे पिंपळपान पण कोणत्याही कामगाराच्या किंवा संस्थापकाच्या लक्षात राहात नाही..! हेमंत-शिशिराचा थंडावा सोसून, अंगाला पुन्हा पांतस्थासाठी वसंतास स्वतःला सोपवून मोकळा होतो तो पिंपळच! वटवृक्षासारखा हा ब्रह्म जरी नसला तरी शांत-निर्मळ पालनकर्त्या विष्णूसारखा नक्कीच आहे. 
 
याचा रंग सुवर्णाला सुद्धा चोरता यावा एवढा हा शांत! याच हसण्याने मोर घाबरतो म्हणे... आश्चर्य आहे..! पण याच्याच वाळलेल्या पिंपळपानावर पाय पडताच त्याला ताल धरता येतो हे तितकेच सत्य आहे! हे पिंपळपान त्या मोराच्या   लक्षात कसे काय राहात नाही...!
 
आच कॉलेजच्या आवारात एक भला मोठा पिंपळवृक्ष होता. तो अतिशय विशाल असल्याने तो वृद्ध भासत होता. माला कोणी जन्म दिला किंवा याचा कोणत्या सरांनी सांभाळ केला हे महत्त्वाचे नसून तो आम्हाला काय काय द्यायचा हेच महत्त्वपूर्ण आहे! पिण्याच्या पाण्याची टाकी याच्याच थंड छायेत तृषितांना तृप्त करत होती. ती पण गर्वाने फुगलेली.. हा मात्र तसाच निश्चिंत. हा मात्र कधी त्या  अहंकारी टाकीवर रागवला नाही. उलट तिला शांत ठेवणसाठी, थंड होणसाठी आपल्या सहस्र हातांनी तिला आच्छादितच ठेवत राहिला! 
 
तित्या उदरात आपल्या पानांनाही कधी पडू देत नसे! पणतिला कुठे राहिली आठवण, त्या पिंपळपानांची.. 
 
अं.. ! हे असंच असतं. आपल्या घरातल्या कर्त्यापुषाचं! हं... असंच असतं.. असो, हे पिंपळपान कधी कधी त्या   भीष्मासारखे वाटते; अजीव-अभंग आणि नवजीवन देणारे, प्रत्येक क्षणाला!
 
विठ्ठल जोशी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती