दुधाच्या कॅप्सूलपासून बनवा चहा- कॉफी

चहा वा कॉफीमध्ये दूध टाकण्याच्या झंझटीतून आता सुटका होऊ शकते. कारण शास्त्रज्ञांनी अशी एक विद्राव्य दूध कॅप्सूल तयार केली आहे, जी चहा वा कॉफीमध्ये शुगर क्युब्सप्रमाणेच वापरली जाऊ शकते. या कॅप्सूलमुळे केवळ पॅकेजिंग सामग्रीवरील खर्चच कमी होणार नाही तर पारंपरिक प्लास्टिक कंटेनरचीही गरज भासणार नाही. 
 
जर्मनीतील हॅले-विटनबर्गमधील मार्टिन लुथर विद्यापीठाच्या मार्था वेलनर यांनी सांगितले की या कॅप्सूलच्या चहूबाजूने एक प्रकाराचे क्रिस्टलीय थर असतात, जे गरम पदार्थांमध्ये सहजपणे मिसळतात. या कॅप्सूलचे उत्पादन तुलनेने सोपे आहे. त्यासाठी सर्वात आधी दूध आणि साखरेचे मिश्रण वा तशीच एखादी कोटिंग करण्यास सक्षम सामग्री तयार केली जाते. जसजसे मिश्रण थंड होते, तशी अतिरिक्त साखर कडेला जाऊन तिला एक क्रिस्टलचे रूप प्राप्त होते. या दरम्यान दूध आणि साखरेचे मिश्रणही आत भरले जाते. 
 
शास्त्रज्ञांनी सर्वोत्तम परिणाम देणारी सामग्री आणि थंड होण्याची प्रक्रिया पूर्ण करणार्‍या सामग्रीची ओळख करण्यासाठी अनेक प्रयोग केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती