इडली, ढोकळा किंवा उपमा तब्बल तीन टिकणार

गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:30 IST)
इडली, ढोकळा किंवा उपमा तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ हे पदार्थ टिकतील आणि त्याच चविने ते खाताही येतील, अशी सायंटिफिक पद्धत मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख वैशाली बांबोले यांनी शोधून काढली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बांबोले यांनी या 
संशोधनाची माहिती दिली. 
 
अशा अन्नाचा वापर अंतराळात जाताना, बचाव कार्यादरम्यान किंवा परदेशात जाताना होऊ शकतो. ही संकल्पना पूर्णत्त्वास नेताना यावर मायक्रोबायोलॉजिकल, कलर, टेक्श्चर, सेन्सरी अनॅलिसिस करण्यात आले असून, त्याची पौष्टिक गुणवत्ताही वैज्ञानिकांकडून तपासण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती