......फॅशन....

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (17:56 IST)
आत्ता काल परवा कुणीतरी व्हाट्सएपमध्ये एक जोक पाठविला, त्यात एक भिकारी दोन मुलींना उद्देशून म्हणतोय की हा माझा एरिया आहे, तुम्ही दुसरीकडे कुठं जा! ...कारण काय तर त्या "उच्छभ्रू"मुलींनी "फॅशन"च्या नावाखाली अगदी फाटक्या, तंग, अश्या पॅन्ट घातल्या होत्या, ज्याची लक्तरे लोळत होती.
 
मुद्दा असा की फॅशनच्या नावाखाली काहीही घालून फिरणं, आणि सर्वांनी त्याचे समर्थन करणं गरजेचं झालं आहे. या गोंडस नावाखाली काहीही विकल्या जातं कारण काहीही घालायची तयारी आहे, आजकालच्या पिढीची.
 
कुठं काय कपडे घालायचे ह्याचे "भान"मुलांना असणे गरजेचे आहे असं मला वाटत. अर्ध शरीर उघड पडलंय आणि इकडे तीकडे हात लावीत कपडे सावरण कितपत बरं दिसत, हे ज्याचे त्यांन ठरवावं. पेहेरावात सुटसुटीत पणा नक्कीच असावा, ज्यात आपण वावरणे सुटसुटीत पणे करू शकत असू असे कपडे नक्कीच वापरावे.पण मुद्दामहून कुणाची नजर आपल्या कडे परत परत फिरेल असे कपडे घालणे थोडं टाळलं पाहिजे.
 
पण आता मुद्दा असाही आहे, तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, हो मान्य आहे ते ही. पण मग ह्यासाठी घरातून मुलांना ह्याबाबतची योग्य ती जाणीव व्हायला हवी आहे.
 
जेव्हा ते घरा घरातून घडेल तेव्हा कुठंतरी याचा विचार केल्या जाईल एवढं मात्र नक्कीच!
TV किंवा सिनेमा ह्या माध्यमातून पण खुपसा प्रभाव पडलेला दिसून येतो. अमुक प्रकारची टिकली, अमुक साडी किंवा एखादा प्रकारचा दागिना, या माध्यमातून प्रकाशझोतात येतो, आणि मग ताबडतोब तो बाजारातून मिळावयास लागतो.
 
आणि आवडीने लोक ते घालून मिरवीतात. काही अंशी ते बरं ही दिसतं पण त्यातील सगळेच प्रकार रोजच्या आयुष्यात वापरण्या जोगे असतात का?हा ही एक प्रश्नच आहे.
 
असो हा ज्याचा त्याचा विचारांचा प्रश्न आहे, पण थोडं विचारपूर्वक वागलं आणि फॅशन याचा योग्य ताळमेळ बसविला की सगळ्यांसाठीच ते योग्य होईल !! 
........अश्विनी थत्ते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती