निबंध :वाहतुकीचे नियम का पाळावे ?

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:10 IST)
सामाजिक आणि औद्योगिक विकासासह वाहतुकीचे बरेच मार्ग विकसित केले आहे. या पैकी रस्ते रहदारी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. हे महत्त्वपूर्ण साधन सुरळीत करण्यासाठी काही नियम बनविण्यात आले आहे. या नियमांचे पालन करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. कारण हे नियम सर्व नागरिकांच्या हिताच्या उद्देश्याने बनलेले आहे. वाहतुकीचे किंवा रहदारीच्या नियमांचे पालन केल्यानं प्रवास आनंददायी आणि सुरक्षित बनतो. 
जर आपण या नियमांचे उल्लंघन केले तर एखाद्या अपघाताला बळी पडतो. 
आपण स्वतः किंवा आपल्या मुळे एखादा देखील अपघाताला बळी पडतो. म्हणून रहदारीचे नियम पाळणे अनिवार्य आहे. 
 
सुरक्षित रहदारीचे नियम -
भारतात रहदारीचे काही नियम आहे जाणून घेऊ या.
 
1 डावी कडून चालावे - हे रहदारीचे मुख्य नियम आहे. या मुळे माणूस व्यवस्थित आपल्या गंतव्याला पोहोचतो. 
2 हेल्मेट वापरावे.- दोनचाकी वाहन चालवताना नेहमी त्याच्या मागे बसताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. या मुळे अपघातापासून बचाव होतो. 
3 विहित वेग मर्यादेचे पालन- रस्त्यावर सुरक्षित रहदारीसाठी वाहनांची वेग मर्यादा निश्चित केली आहे.रस्त्यावर ताशी 40 किमी वाहनाचा वेग आदर्श मानला आहे.  
4 सीट बेल्ट बांधणे- कार,किंवा चारचाकी वाहने वेगाने धावतात या मुळे अपघातामध्ये बहुतेक लोकांचा मृत्यू पुढे आदळल्याने होतो. सीट बेल्ट माणसाला पुढे येण्यापासून रोखतात म्हणून सीट बेल्ट लावावे. 
5  दुसऱ्या वाहनांना ओव्हर टेकिंग- पुढील चाललेल्या वाहनाचे संकेत मिळाल्यावरच त्या वाहनाच्या उजव्या बाजूने निघावे. चुकून देखील चुकीच्या दिशेने ओव्हर टेक करणे घातक ठरू शकते. 
ओव्हर टेक करताना हे लक्षात ठेवा की  समोरून कोणते ही वाहन तर येत नाही. 
 6 रहदारीचे इतर नियम 
* मद्यपान करून वाहने चालवू नये. 
* वाहन सरळ मार्गावर चालवा.
* वाहन वळवताना आवश्यक सिग्नल द्या आणि हॉर्न वाजवा.
* वाहनांत निर्धारित संख्येपेक्षा जास्त बसवू नका. 
* शाळा,हॉस्पिटल चौरस्त्यावर वाहनाचा वेग कमी करा.
* चमकदार हेडलाईट्स वापरू नका. 
* हेडलाईट्सचा वरील भाग काळ्या रंगाने रंगवा. 
* रात्री डिपर वापरा.
* वाहनांची नंबर प्लेट वर नंबरच्या व्यतिरिक्त काही नसावे. 
* खाजगी वाहनांची नंबर प्लेट पांढऱ्या रंगावर काळ्या शाई ने आणि व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट पिवळी असून त्यावर काळ्या शाईने नंबर लिहावे. 
* 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना गिअरची वाहने प्रतिबंधित आहे म्हणून या वयाच्या कमी असणाऱ्या लोकांनी वाहने चालवू नये.  
* लायसेन्स आणि वाहन चालविण्याची परवानगी वाहन नोंदणी आवश्यक असावी. 
* रहदारीच्या चिन्हांचे अनुसरणं करा. 
* वाहनाच्या मागे आणि पुढे लाईट रिफ्लेक्टर असावे 
* अधिक प्रदूषण करणारे वाहन वापरू नये. 
* रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालविताना मोबाईल वर बोलू नये. 
* रेलवे गेट बंद असल्यास थोड्या वेळ थांबा क्रॉसिंगच्या खालून जाऊ नका. 
* पायी चालताना किंवा रास्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावे. रस्त्यावर पायी चालताना पादचारी मार्गाचा वापर करावे. 
* डावी कडील पादचारी मार्गावर चाला. 
अपघाताचे मुख्य कारण आहे घाई आणि असावधगिरी .घाई गर्दी मुळे अपघात घडतात. पायी चालणाऱ्याने आणि वेगाने वाहने चालवणाऱ्याने घाई करू नये.
कर्तव्य - 
एक सुजाण नागरिक होण्याच्या नाते आपले कर्तव्य आहे की रहदारीच्या नियमांचा काटेकोर पालन करावे आणि एखादा अपघातात घायाळ झालेल्याला वेळेवर दवाखान्यात न्यावे जेणे करून त्याचा जीव वाचेल. अपघातग्रस्त माणसाला वेळेत उपचार देण्यास नकार केल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. आपण रस्त्यावर अपघातात घायाळ झालेल्या व्यक्ती ची यथायोग्य मदत करा. आणि देशाचे सुजाण नागरिक होण्याचे कर्तव्य पूर्ण करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती