संगणक मानवी जीवनासाठी शाप आहे की वरदान

गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (15:10 IST)
संगणक हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक मोठा शोध आहे. ही एक सामान्य मशीन आहे ज्यामध्ये आपली स्मृती सर्व डेटा जतन करण्याची क्षमता ठेवतं. हे वापरणे सोपं असतं. लहान वयाची मुलंदेखील याचा वापर सहजपणे करतात. 
 
आज सगळीकडे याचा सर्रास वापर करण्यात येत आहे. कमीत कमी वेळ घेऊन हे माणसाच्या श्रम आणि शक्तीला वाचवतं. आजच्या काळात संगणक शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकतं नाही. याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करण्यात येत आहे. हे हाताळायला सोपं असतं. संगणकाद्वारे इंटरनेट द्वारे आपण घरात बसून ऑनलाईन मोफत डिलिव्हरी मिळवू शकतो. शाळेच्या प्रकल्पात देखील मदत मिळते. सध्या ऑफिस, बँक, हॉटेल, शिक्षण संस्थान, शाळा, कॉलेजात, दुकानात, व्यवसायात, इत्यादीत संगणकाचा वापर करतात. काही लोक आपल्या मुलांसाठी लॅपटॉप आणि डेस्कटॉप विकत घेतात. जेणे करून ते आपल्या अभ्यासाशी निगडित सर्व कामे करू शकतात. 
 
हे एक इलेक्ट्रानिक मशीन आहे जे गणना करण्यासाठी, खेळण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी, गाणे ऐकण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी मदत करतं. शेतीच्या कामासाठी देखील हे उपयोगी असतं. असे एकही क्षेत्र नाही जिथे संगणकांचा वापर होत नाही. हवामानाचा अंदाज, पुस्तक छापणे, वृत्तपत्र, निदानरोग इत्यादीसाठी संगणकाचा वापर करण्यात येतो. तसेच जगाच्या कोणत्याही काना कोपऱ्यातून ऑनलाईन रेल्वे आरक्षण, विमानाचे तिकीट, हॉटेलची बुकिंग घरी बसल्या केली जाऊ शकते. 
 
मोठ्या मोठ्या एमएनसी कंपनीमध्ये देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या मध्ये पॅरोल, स्टॉक नियंत्रण साठी वापरतात. संगणक अवकाश यानाला देखील नियंत्रित करू शकतो. संगणक एकाच वेळी साधारणपणे पन्नास माणसांचे काम करू शकतो तेही कमी वेळात आणि अचूक पणे. 
 
संगणकाचे काही फायदे आहे तसेच त्याचे तोटे देखील आहे. म्हणजे हे वरदान शिवाय शाप देखील आहे. मानवांसाठी संगणकाचे शेकडो फायदे आहेत ज्यात सायबर अपराध, अश्लील वेबसाइट्स सारखे तोटे समाविष्ट आहे. लहान मुलं सर्रास हे पॉर्न साईट्स देखील बघतात आणि नको त्या व्यवहारात गुरफटतात. त्यामुळे ते आपल्या मार्गावरून भरकटतात. गुन्हेगारीच्या मार्गाला लागतात. 
 
संगणकामुळे लोक रोजगाराला मुकले आहेत. एक संगणक 50 माणसांचे काम करतं त्यामुळे रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. खरे तर जसे संगणकाचे फायदे आहे तसेच तोटे देखील आहेत. कोणत्या ही वस्तूंचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील असतात. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडल्यावर त्याचा त्रास होणारच. असेच संगणकाचा चांगला वापर केलास तर ते आपल्यासाठी वरदानच आहे पण त्याचा दुरुपयोग केल्यास हे आपल्यासाठी शाप आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती