ब्रँडेड वस्तू वापरत असाल तर मित्र जातील दूर

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (15:30 IST)
ब्रँडेड वस्तू वापरण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे आपली इमेज वाढेल, लोक आकर्षित होतील, असा सज असतो. मात्र, एका संशोधनाने हे चुकीचे ठरविले आहे. ब्रँडेड वस्तू वापरणार्‍यांसोबत लोक मैत्री करत नाही असं संशोधनातून समोर आले आहे. लोक सहसा असे मानतात की लक्झरी कार, ब्रँडेड साहित्य किंवा चांगले कपडे अशा वस्तूवापरल्यामुळे समाजातील लोक आपल्याकडे आकर्षित होतील. परंतु, संशोधन याउलट सूचित करते. संशोधकांनी सहावेळा वेगवेगळे संशोधन केले आहे.
 
एका गटातील लोकांसाठी ब्रँडेड वस्तूची निवड करण्यात आली. तर दुसर्‍या गटासाठी साध्या वस्तूंची निवड करण्यात आली होती. परंतु, जेव्हा लोकांना दोन्हीपैकी एक मित्र निवडण्यास सांगितले तेव्हा लोकांनी ब्रँडेड वस्तू न वापरलेल्या लोकांना प्राधान्य दिले.
 
संशोधनापैकी एका संशोधनात दोन सहभागींना टी शर्ट घालून पिकनिकला जाण्यासाठी सांगितले. एका सहभागीने वॉलमार्ट लिहिलेला टी-शर्ट घातला होता तर दुसर्‍याच्या टी-शर्टवर सक्स फिफ्थ एव्हेन्यूचा लोगो होता. वॅालमार्ट टी शर्ट ब्रँडेड नसताना हा शर्ट घातलेल्या व्यक्तीला 64 टक्के लोकांनी निवडले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती