विराटने म्हटले, 'अनुष्का माझी कॅप्टन'

मंगळवार, 22 मे 2018 (11:56 IST)
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यपीएलध्ये तिचा पती विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला सपोर्ट करताना स्टेडियमध्ये बघावयास मिळाली. दरम्यान, पत्नी अनुष्काशी संबंधित विराटचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पत्नी अनुष्काचे गोडवे गाताना दिसत आहे. व्हिडिओध्ये विराटने मान्य केले की, मी जरी फिल्डमध्ये कॅप्टन असलो तरी, 'ऑफ फिल्डमध्ये माझी कॅप्टन अनुष्का आहे.' कोहलीचा हा मुलाखतीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, चाहत्यांकडूनही त्यास पसंत केले जात आहे. विराटने अनुष्काविषयी म्हटले की, 'ती देशात असो वा बाहेर मॅच नक्की बघत असते. अनुष्काच्या मनात या खेळाविषयी खूप आदर आणि उत्सुकता आहे. कारण ती या खेळाविषयी खूप जवळून जाणून आहे. जेव्हा विराटला विचारण्यात आले की, 'ऑफ फिल्ड कॅप्टन कोण आहे?' तेव्हा तो काही वेळ शांत राहिला अन्‌ नंतर उत्तरात त्याने अनुष्काचे नाव घेतले. त्याने म्हटले की, 'ती नेहमीच सकारात्क विचार करीत असते. त्यामुळे ती नेहमीच योग्य निर्णय घेते. त्यामुळेच ती माझी 'ऑफ फिल्ड कॅप्टन' आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती