ही तर फक्त सुरुवात आहे - विराट

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (10:36 IST)
सलग 18 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला असला तरी कर्णधार विराट कोहलीला मात्र ही कामगिरी फार मोठी वाटत नाही. 'ही तर फक्त सुरुवात आहे. अजून बरेच वर्षे आम्हाला कामगिरी सातत्य राखायचे असून ही त्या गोष्टींची पायाभरणी आहे,' असे कोहली ने सांगितले. या वर्षातील कामगिरीबाबत कोहली म्हणाला की, 'भारतीय क्रिकेटासाठी हे वर्ष चांगले होते. या वर्षात आशिया चषक आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका आम्ही जिंकली त्याचबरोबर प्रत्येक कसोटी मालिका आम्ही जिंकली. संघासाठी हे वर्ष संस्मरणीय आहे. 

वेबदुनिया वर वाचा