भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची व्यवस्था अद्याप नाही

शनिवार, 13 जुलै 2019 (10:10 IST)
विश्वचषकातील भारताचा प्रवास संपलेल्या टीम इंडियाचा मायदेशी परतीचा प्रवास सुरु झाला, तर आता भारतीय संघासमोर वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे.  सेमीफायलनध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. त्या पराभवानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतण्यासाठी निघाले होते, मात्र त्यांचं तिकीटच बूक न झाल्याने, आता त्यांना वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत इंग्लंडमध्ये रहावे लागणार आहे. टीम इंडियाची वाहतूक व्यवस्था पाहणारे व्यवस्थापकाची डोकेदुखी वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI भारतीय खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची व्यवस्था अद्याप करु शकली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत भारतीय संघाला मँचेस्टरमध्येच राहावं लागणार आहे. सेमीफायनलमधील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंचे रिटर्न तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिकीटं मिळाली नाहीत. त्यामुळे आता लॉर्ड्सच्या मैदानावर 14 जुलैला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील फायनल सामन्यानंतरच भारतीय संघ मायदेशी परतेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती