सचिन तेंडुलकरचे 44 व्या वर्षात पदार्पण

निवृत्तीच्या चार वर्षानंतरही क्रिकेटर सचिन तेंडुलकर नावाची जादू कमी झालेली नाही. एकदा खेळाडू क्रिकेटच्या क्षितिजावरून निवृत्त झालात की, त्याला लोक चटकन विसरून जातात. पण सचिन रमेश तेंडुलकर याला अपवाद आहे.
तेंडुलकर या नावाला आजही लोक विसरलेले नाहीत. आजही कोट्यावधीत क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील सचिन ताईत आहे. आजही सचिनला क्रिकेटचा देव मानणारा मोठा वर्ग आहे. वयाच्या 44 व्या वर्षात याच आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरने पदार्पण केले. 
 
सचिनच्या नावावर 34357 धावा जमा आहेत. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 18,426 आणि कसोटीमध्ये 15,921 धावा केल्या. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांची नोंद आहे. वनडे सामन्यामध्ये पहिले द्विशतक झळकवण्याचा मानही सचिनकडेच जातो. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिले द्विशतक झळकावले. 
 
सचिनच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सचिनची पत्नी अंजलीने निवासस्थळी सचिनला केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन उपस्थित होता.

वेबदुनिया वर वाचा