टीम इंडियाच्या विजयासाठी पाकिस्तानात मागत आहे दुआ

वर्ल्ड कप 2019 चा रोमांच सुरू असून भारत आणि इंग्लंड दरम्यान 30 जून रोजी सामना होणार आहे. वर्ल्ड कपचे समीकरण असे कसे झाले आहेत की पाकिस्तानचे क्रिकेट फॅन टीम इंडियाच्या विजयाची दुआ मागत आहे. भारताने इंग्लंडला पराभूत करावे अशी इच्छा पाक चाहत्यांची आहे.
 
समीकरणे असे झाले आहे की भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट फॅन एक झाले आहेत. असे कधीच घडले नाही की दोन्ही देशांचे चाहते एकमेकांचा समर्थन करत असतील परंतू इंग्लंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानी चाहते भारतीय संघाला समर्थन देताना दिसू शकतील.
 
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी ट्विट करत विचारले आहे की पाकिस्तानी चाहते भारत आणि इंग्लंडच्या सामान्यात कोणाला समर्थन देतील? अनेक चाहत्यांनी उत्तर दिले की आम्ही तर भारतालाच समर्थन देणार कारण भारत आमचा शेजारी देश असून भारतीयांमध्ये क्रिकेटप्रती वेगळा जुनून आहे. तसं असे ही नाही की सर्व पाकिस्तानी चाहत्यांनी भारताला समर्थन देण्याची इच्छा व्यक्त केली. काही लोकांचे उत्तर वेगळे होते. जसे नाजिया अफरीदी यांनी इंग्लंड विजयी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
 
नासिर हुसैन भारतीय मूळचे असून अनेक वर्ष इंग्लंडचे कर्णधार राहून चुकले आहेत. त्याच्या या ट्विटवर इंग्लंडचे माजी कर्णधार केव्हिन पीटरसन यांनी त्यांनाच विचारले की ‘नासिर आपण कोणाला समर्थन देत आहात.
 
नासिर यांनी उत्तर दिले की ‘अगदी इंग्लंडलाच, त्याप्रकारे जसे आपण दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी टीमसाठी करतात. केव्हिन दक्षिण आफ्रिका मूळचे असून इंग्लंडसाठी खेळतात.
 
तर पाकिस्तान या प्रकारे पोहचेल सेमीफायनलमध्ये
पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध आपले दोन्ही सामने जिंकावे लागतील. सोबतच दुआ करावी लागेल की भारत- न्यूझीलँडचे सोबत होणारे सामन्यात इंग्लंडने पराभूत व्हावे. ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहचला असून न्यूझीलँड आणि भारताचा पोहचणे एका प्रकारे निश्चित आहे. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कठीण लढा असू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती