हिटॅमन रोहित शर्माने झळकावले 29 वे शतक

सोमवार, 20 जानेवारी 2020 (12:40 IST)
शानदार विजयाने मालिका भारताच्या खिशात
भारतीय संघाचा सलामीवीर हिटॅमन रोहित शर्माने कांगारूंना जोरदार दणका देत शानदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या रोहित शर्माने संयमी खेळ करत वन-डे क्रिकेटमधील आपले 29 शतक पूर्ण केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया  संघादरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून तिसर्‍या आणि अखेरच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता न आलेल्या रोहित शर्माने तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 110 चेंडूत आपले शतक साजरे केले. रोहितच्या या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे रोहितचे हे 8 वे शतक आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळवणारा रोहित शर्मा चौथा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला रोहितने मागे टाकले असून जयसूर्याच्या नावावर 28 शतके आहेत. रोहितने 194 डावात 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यादीत दुसर्‍या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स असून त्याने 205 डावात ही काम गिरी केली. रोहितला हा टप्पा ओलांडण्यासाठी 217 डाव खेळावे लागले. नव्या विक्रमाला गवसणी घालतानाच रोहितने माजी भारतीय खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनाही मागे टाकले आहे.
 
विराट कोहलीच्या नावेही विक्रम 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. सर्वात जलद 5 हजार धावा करणारा कर्णधार म्हणून विराट कोहलीची नोंद झाली आहे. याच सामन्यात 17 धावा काढल्यानंतर त्याने या विक्रमाला गवसणी घातली. कर्णधार म्हणून 5 हजार धावा करणारा विराट आठवा कर्णधार ठरला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती