बुमराहची पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड

सोमवार, 13 जानेवारी 2020 (13:25 IST)
भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 2018-19 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जसप्रीतची बीसीसीआयच्या मानाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्याचा सन्मान होणार आहे. 
 
2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जसप्रीतने आपल्या तेजतर्रार मार्‍याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आहे. त्याने केवळ 12 कसोटी सामन्यात 62 बळी मिळवत फार कमी कालावधीत संघातील आपले स्थान पक्के केले. याचसोबत अनेक महत्त्वाच्या मालिकांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. त्याच्या याच कामगिरीचा आता बीसीसीआयतर्फे सन्माद केला जाणार आहे. याव्यतिरिक्त 2018-19 सालात कसोटीत सर्वाधिक धावा करण्यासाठी चेतेश्वर पुजारा, सर्वाधिक बळी घेण्यासाठी जसप्रीत बुमराह यांचा सत्कार होणार आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये वन-डे सामन्यात सर्वाधिक धावांसाठी स्मृती मंधाना तर सर्वाधिक बळी घेण्यासाठी झुलन गोस्वामी यांची निवड करणत आली आहे. मयांक अग्रवालला सर्वोत्तम पदार्पण पुरुष तर शेफाली वर्माला सर्वोत्तम  पदार्पण महिला खेळाडू या किताबाने गौरवण्यात येईल.
 
इतर सन्मानार्थी खेळाडूंची यादी
कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार :
कृष्णमचारी श्रीकांत (प्रमाणपत्र- सन्मानचिन्ह आणि 25 लाखांचा धनादेश)
 
महिला खेळाडूंसाठी जीवनगौरव पुरस्कार :
अंजुम चोप्रा (प्रमाणपत्र- सन्मानचिन्ह आणि 25 लाखांचा धनादेश)
 
पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू :
जसप्रीत बुमराह (प्राणपत्र-सन्मान चिन्ह आणि 15 लाखांचा धनादेश)
 
सर्वोत्कृष्ट हिला आंतरराष्ट्री खेळाडू :
पूनम यादव (प्रमाणपत्र- सन्मानचिन्ह आणि 15 लाखांचा धनादेश).

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती