अजिंक्य रहाणे पाहतोय ऐतिहासिक कसोटीचे स्वप्न

बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (14:40 IST)
भारत शुक्रवारपासून (22 नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. या दरम्यान भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र स्वप्नांमध्ये रमलेला आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो झोपलेला असून त्याच्यासोर गुलाबी चेंडू ठेवलेला दिसतो आहे. 
 
त्या फोटोला त्याने 'मी आतापासूनच गुलाबी चेंडूने खेळल्या जाणार्‍या ऐतिहासिक कसोटीची स्वप्ने बघू लागलो आहे', असे कॅप्शन दिले आहे. यावर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि विराट यांनी भन्नाट रिप्लाय देखील दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती