बिग बॉसच्या घरातून बिचुलके यांना अटक

शुक्रवार, 21 जून 2019 (16:44 IST)
बिग बॉसच्या घरातून सदस्य अभिजीत बिचुलके यांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यात चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अभिजीतल्या बेड्या ठोकल्या आहेत. बिग बॉसच्या घरात जाऊन अभिजीतला अटक करण्यात आली. आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेंना अटक केली आहे. यामुळे बिचुलके यांना बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे. या आधी दोन दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात महिलेला अपशब्द वापरल्यामुळे अभिजीत बिचुकले यांची भाजपाच्या माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. टास्कदरम्यान रूपाली भोसलेशी झालेल्या वादात अभिजीत यांनी रूपालीला शिव्या दिल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती