सिद्धार्थची हॉलीवूड भरारी

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (08:55 IST)
पुण्याचा सिद्धार्थ बडवे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर" या हॉलिवूडपटात त्यांची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटात तो एकमेव भारतीय आहे.

लहानपणापासून अभिनयाची आवड असलेला सिद्धार्थ बालनाट्यांमध्ये काम करत आपली अभिनयाची बाजू विकसित करत होता.आधी शिक्षण आणि नंतर सगळं असं सिद्धार्थच्या वडिलांनी त्याला बजावलं होत. पुण्यात आर्किटेक्चरची पदवी घेत असताना फिरोदिया, पुरुषोत्तम अश्या अनेक एकांकिका स्पर्धांमधून त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला खरी सुरुवात केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी काम शोधत असताना त्याची  हिंदी सिने चित्रपटसृष्ठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी 'मशीन' या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून निवड केली. अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून असलेला सिद्धार्थ सहाय्य्क दिग्दर्शन करताना अभिनयाचे अनेक पैलू शिकत होता. हृदयांतर चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शन केले असून, लग्न कल्लोळ या आगामी चित्रपटासाठी तो सह दिग्दर्शन करत आहे. याच दरम्यान त्याने अभिनयाच्या सर्व पैलू मध्ये पारंगत करून घेतले होते. अभिनयाची भूक भागवण्यासाठी काम शोधात असताना त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता छायाचित्रकार दिलशाद व्ही. ए. यांनी एका चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेसाठी सिद्धार्थचे नाव सुचवले. एलिस फ्रेझीर यांनी त्याची निवड प्रक्रिया पूर्ण करत त्याचे नाव प्रमुख भूमिकेसाठी निश्चित केले. "एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर" या हॉलीवूड पटात  सिद्धार्थ सोबत अनेक हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत. 
माझी कारकीर्द हि फारच वेगळी म्हणावी लागले कारण सह दिग्दर्शन ते अभिनेता हा प्रवास खरंच रोमांचकारी होता. हे सर्व करत असताना मला वाटलं हि नव्हतं कि मी एक हॉलिवूडचा सिनेमा करेन. मात्र अथक परिश्रम साथ देतात ते खरं आहे. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहताना फार आनंद होईलच पण या सगळ्यात जास्त आनंद त्यावेळी आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यात असेल. या सगळ्यात जॉनी लीव्हर सर, अब्बास मस्तान सर, एलिस फ्रेझर सर, यांनी मला दिलेलं मार्गदर्शन हे सगळ्यात मोलाचे आहे."  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती