नाटक “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार रात्रौ 8.00 वाजता “शिवाजी नाट्य मंदिर” मध्ये प्रस्तुत होणार !

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (16:09 IST)
“थिएटर ऑफ रेलेवन्स” अभ्यासक आणि शुभचिंतक आयोजित नाटक  “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार  रात्रौ 8.00 वाजता "शिवाजी नाट्य मंदिर” दादर(पश्चिम), मुंबई मध्ये सादर होणार! सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “राजगति” समता, न्याय, मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्य’ ला बदलण्याची चेतना जागवते, ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळा' ने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वा' चा निर्माण व्हावा.
कधी :23 जानेवारी 2019, बुधवार  रात्रौ 8.00 वाजता
कुठे : “शिवाजी नाट्य मंदिर”, दादर(पश्चिम), मुंबई
 
कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाती वाघ  प्रियंका कांबळे,ऋषिकेश पाटिल,मनीष घाग, सुरेखा साळुंखे आणि सचिन गाडेकर।
 
वेळ :120 मिनिटे
 
नाटक 'राजगति' : नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य लोक लोकशाही चे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा  भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळा' ने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वा' चा निर्माण व्हावा.
 
नाटक “राजगति” का ?
आपले आयुष्य दर क्षणी 'राजनीती' ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक 'सभ्य' नागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या 'मताचे दान' करतो आणि आपल्या राजनैतीक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतिला कोसत राहतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती 'वाईट' आहे... चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोत, राजनीति आमचे काम नाही, जर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते?...चला, एक सेकंद विचार करूया, की खरंच राजनीति वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?...
 
चला जरा विचार करूया की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र चालू शकेल का... नाही चालणार... आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे... चला एक सेकंद विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?... 
 
आपण सगळे अपेक्षा करतो की, 'गांधी, भगतसिंग, सावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावी पण माझ्या घरात नाही …चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थे’ ला शुद्ध आणि  सार्थक बनवू ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी 'राजनैतिक परिदृश्य' बदलण्याची चेतना जागवू, ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन 'आत्मबळाने' प्रेरीत 'राजनैतिक नैतृत्वाचा' निर्माण होईल. 
 
“थिएटर ऑफ़ रेलेवंस” 26  वर्षांपासून फॅसिस्टवादी ताकदिंशी झगडत आहे . जागतिकीकरण आणि फॅसिस्टवादी शक्ती‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती जी माणसाला माणूस बनवते ! 
“थिएटर ऑफ रेलेवन्स” …. 26 वर्षांपासून सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदाना पासून मुक्त. सरकारच्या 300 ते 1000 करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेट च्या विरुद्ध 'प्रेक्षक' सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत! 
 
लेखक - दिग्दर्शक  : "थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
 
प्रेक्षक सहयोग आणि सहभागीतेने आयोजित या प्रस्तुती मध्ये आपल्या सक्रिय सहयोग आणि सहभागितेची अपेक्षा!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती