'नाळ' चित्रपट जोरात, आतापर्यंत १८.५० कोटीचा गल्ला जमवला

बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (07:59 IST)
सध्या बॉक्स ऑफीसवर‘नाळ’चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या सात दिवसांतच सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल चौदा कोटींची विक्रमी कमाई केली. तर आता दुसऱ्या आठवड्यात ४.५० कोटी रुपयांची भर पडली आहे. सुधाकर रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत १८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईसंदर्भातली ही माहिती दिली आहे.‘पैसा कमवून देणारा हा चित्रपट ठरतोय,’असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. मराठी व्यतिरिक्त इतर भाषिकांना आकर्षित करण्यासाठी झी स्टुडिओने बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, सुरत, वडोदरा आणि चेन्नई या शहरांमध्येही चित्रपट प्रदर्शित केल्याची माहिती तरणने दिली आहे.
 
मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल नेटवर्क साइट्सवरूनही चित्रपटाबद्दल, लहानग्या चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती