पाहा मराठी चित्रपटांचा समग्र इतिहास ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’

मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (16:26 IST)
मराठी चित्रपटांचा समग्र इतिहास ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळावर सिनेरसिक आणि अभ्यासकांसाठी  एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘व्ही. शांताराम फाउंडेशन’चे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ व्या एशियन फिल्म फेस्टिवलच्या सांगता समारंभात ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) संकेतस्थळाचे उद्घाटन ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळाच्या निमित्ताने वडिलांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान किरण शांताराम यांनी या निमित्ताने व्यक्त केले. मराठी चित्रपटाचा सर्वांगीण विचार करून बनविलेले ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) हे संकेतस्थळ चित्रपटसृष्टीशी संबंधित अभ्यासकांसाठी उपयुक्त  ठरणार आहे. 
 
‘व्ही. शांताराम फाउंडेशन’ची स्थापना केली. हिंदी आणि विशेषतः मराठी चित्रपटांचे दस्तावेज तयार करणे, ग्रंथ प्रकाशित करणे, चित्रपट विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम या फाउंडेशन तर्फे आयोजित करावे हे व्ही. शांताराम बापूंचे स्वप्न होते. व्ही. शांताराम यांनी भविष्यात मराठी सिनेसृष्टीचा दस्तावेज संगणकावर नोंदवून ठेवण्याविषयीची इच्छा आपले सुपुत्र किरण शांताराम यांच्याकडे बोलून दाखविली होती.

वेबदुनिया वर वाचा