जरांगे पाटलांच्या सिनेमाचे नवे गाणे रिलीज

शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (17:35 IST)
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे. सरकारला आमरण उपोषण करत धारेवर धरले. महाराष्ट्रभर त्यांच्या आंदोलनाने आणि वारंवार केलेल्या आरक्षणाच्या मागणीमूळे त्यांच्या नावाची चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून मराठा समाजारा आरक्षण मिळावं म्हणून आजही लढा देत आहे.  
 
मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर आधारित एक सिनेमा येत आहे. येत्या 26 एप्रिलला  ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं नुकतंच रिलीज झालं असून त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन केलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘उधळीन मी…’ या  गाण्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. व ‘मर्दमावळा…’ हे गाण स्वरबद्ध गायक दिव्य कुमार यांनी केले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
अभिनेता रोहन पाटील यांनी ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच काही प्रमुख भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, यांनी साकारल्या आहे.  
 
‘संघर्षयोद्धा’ या सिनेमाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी असून याआधी त्यांनी धुमस, मुसंडी, मजनू आदी चित्रपटांसाठी म्हणून दिग्दर्शक काम पाहिलं होते. चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी केले आहे. तसेच संवाद आणि पटकथा डॉ.सुधीर निकम यांनी लिहली असून, सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती