अमृताकडे गुड न्यूज

शनिवार, 2 मार्च 2019 (20:11 IST)
सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरकडे एक गुड न्यूज आहे.  सोशल नेटवर्किंग साइटवर तिने टाकलेल्या फोटोमधून ते दिसून ही येत आहे. तिचा प्रसन्न चेहरा, तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता स्पष्ट करतो. शिवाय गतवर्षाप्रमाणे हे वर्ष देखील तिच्यासाठी धमाल असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर ती बातमी कोणती आहे? याबद्दल तिने आळीपाळीने गुपचिळी पाळली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क तिचे चाहते लावताना दिसून येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती