निर्लज्ज झाल्या आहेत आजच्या मुली: भाग्यश्री

आजकालच्या मुलींना कोण जाणे काय झाले आहे. मोठय़ांसमोर डोळ्यात डोळे घालून बोलायला त्या मुळीच घाबरत नाहीत. ‘याला भेटा, हा माझा बॉयफ्रेंड आहे’, असे बिनधास्तपणे बोलताना त्या दिसतात. अलीकडेच जयपूरमध्ये आलेल्या भाग्यश्रीने हे विधान केले आहे. 
 
जयपूरमध्ये हेरटेजला प्रमोट करण्यासाठी आलेल्या भाग्यश्रीने गप्पा मारल्या. यावेळी ती म्हणाली, ‘माझ्या लग्नाला 26 वर्षे झाली आहेत. मात्र जेव्हाही मी माझ्या सासूबाईंच्या शेजारी असते, तेव्हा जर अचानक माझे पती तेथे आले, तर तेथून उठून मी त्यांच्यापासून दूर जाऊन बसते. 
 
हाच तर मोठय़ांचा आदर आहे.’ ‘माझा निर्णय चुकला, असे वाटत नाही..‘मैंने प्यार किया’ या सिनेमानंतर अचानक सिनेसृष्टीपासून दूर जाणे, हा योगायोग नसून विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. भाग्यश्री म्हणते,’ त्यावेळी माझे वय खूप लहान होते. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाचे शूटिंगच्या काळात मी हिमालय (नवरा)च्या प्रेमात पडले होते. लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली होती. लग्नानंतर कुटुंब आणि करिअरला एकत्र महत्त्व देणे, जमणार नाही, हे मला कळले होते. 
 
त्या निर्णयाचा मला मुळीच पश्चाताप होत नाही. तो त्यावेळी घेतलेला अगदी योग्य निर्णय होता.

वेबदुनिया वर वाचा