‘मेड इन इंडिया’ PSR I500 कीबोर्ड, जागतिक बाजारपेठेसाठी भारतीय वाद्यांच्या ट्यून्सची सुविधा

मुंबई : यामाहा म्युझिक इंडिया 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत सादर करत आहेत पहिला भारतीय कीबोर्ड PSR I500. संगीत शिकू इच्छिणाऱ्या आणि परफॉर्म करणाऱ्या जागतिक संगीतप्रेमींसाठी पोर्टेबल कीबोर्डचा नवा प्रकार एक सुयोग्य निवड आहे. या वाद्यामध्ये व्यापक प्रमाणावरील भारतीय वाद्यांचे सूर आणि ऑटो अकंपनीमेंट स्टाइल सुविधा असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीय संगीत प्रकारांचा प्रचंड मोठा आवाका मिळतो.
 
PSR I500 मध्ये 801 वाद्यांचे सूर आहेत. यातील 40 भारतीय वाद्ये आहेत. या कीबोर्डमध्ये पिआनोपासून सिंथेसायझरपर्यंत विविध प्रकारच्या वाद्यांचे सूर असल्याने यात विविध प्रकारची गाणी वाजवणे शक्य होते... अगदी ऑर्केस्टा क्लासिकपासून इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकपर्यंत सर्व काही.
 
संगीतप्रेमीसांठी हे वाद्य म्हणजे कुठेही सहज नेता येईल असा सुयोग्य कीबोर्ड आहे. 'क्विक सँपलिंग' सारख्या सुविधेमुळे तुम्हाला विविध प्रकारच्या परिस्थितींमध्ये परफॉर्म करता येते. त्याचप्रमाणे, PSR I500 मध्ये 'रियाझ' या सुविधेत बिल्ट-इन तबला/मृदंगम आणि तानपुरा या वाद्यांचे अनेक सूर आहेत. त्यामुळे पारंपरिक भारतीय रागदारीच्या पट्टीत गाणे कसे वाजवावे, याचे धडे या कीबोर्डसह घेता येईल.
 
यामाहा म्युझिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तकाशी हागा म्हणाले, "आमच्या चेन्नई येथील उत्पादन केंद्रात भारतात तयार झालेला कीबोर्ड सादर करताना यामाहा म्युझिक इंडियाला अभिमान वाटतो. 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत आम्ही अत्यंत बहुआयामी आणि वैयक्तिक स्वरुपाचा विचार करून आजवरच्या भारतीय आणि जागतिक संगीतप्रेमींसाठी हा कुठेही सहज नेता येणारा कीबोर्ड तयार केला आहे.
 
भारत म्हणजे विविधतेची भूमी आणि इथल्या अत्यंत चोखंदळ अशा ग्राहकांच्या बहुविध गरजा या नव्या कीबोर्डमुळे पूर्ण होतील. यामाहा म्युझिक इंडिया भारतीय बाजारपेठेसाठी वाद्ये तयार करणार आहेच. शिवाय, भारताला एक निर्यात केंद्रही बनवणार आहे. जगभरातील संगीत क्षेत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सगळीकडूनच प्रचंड मागणी आहे, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये संगीत शिक्षणाच्या महत्त्वाला अधोरेखित केले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. शेकडो संगीत शिक्षक, विद्यार्थी, छंद जोपासणारे आणि व्यावसायिक कलाकारांच्या बहुविध गरजा या अनोख्या, सक्षम आणि वैयक्तिक स्वरुपाच्या उत्पादनांमुळे पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे," असे श्री. हागा पुढे म्हणाले.
 
 
PSR I500 कीबोर्ड 23,990 एमआरपीला उपलब्ध आहे आणि भविष्यात इतर देशांमध्ये निर्यात केला जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती