'एटीएम'मधून पैसे काढणे महागणार?

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:32 IST)
'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण 'एटीएम' व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांच्या शिखर संघटनेने 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी आकारले जाणारे शुल्क वाढण्याची मागणी केली आहे. सध्या 'एटीएम'मधून होणार्‍या व्यवहारावर 15 रुपये शुल्क आकारले जाते. ते 17 रुपये करण्याची मागणी संघटनेने केली आहे. 'एटीएम'मधील सुरुवातीचे पाच व्यवहार निःशुल्क आहेत. मात्र त्यातदेखील कपात करून ते तीन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
सध्या 'एटीएम'मधील व्यवहार  रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 15 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र 'एटीएम' व्यवस्थापनाचा दैनंदिन खर्च वाढत असून कंपन्यांना व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमावलीने कंपन्यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे 'एटीएम' शुल्क वाढवण्याची मागणी 'कन्फडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री' या संघटनेने 'आरबीआय'कडे केली आहे. हा व्यवसाय परवडत नसलने बँका आणि खासगी वित्त संस्थांनी नवीन एटीएम सुरु करण्यापासून हात आखडता घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती