बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सांगलीत हळदीच्या खरेदी-विक्रीचा केंद्र

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सांगलीत 'हळदीच्या खरेदी-विक्रीचा केंद्रा'चा शुभारंभ झाला आहे. हळदीला जागतिक मार्केट उपलब्ध होणार आहे. बीएसईकडून व्यापाऱ्यांसाठी एक वर्षाची फी सवलत, तर शेतकऱ्यांसाठी पहिल्या हंगामात स्टोरेजच्या फीची सवलत जाहीर करण्यात आली आहे.
 
देशातील हळदी उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत 'हळदी'च्या खरेदी-विक्री व्यवस्थेचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने हळदीला जागतिक मार्केट उपलब्ध झालं आहे. बीएसईकडून व्यापाऱ्यांसाठी एक वर्षाची फी माफी, तर शेतकऱ्यांसाठी पहिल्या हंगामात स्टोरेजसाठी फी माफ असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. बीएसईने आज हळदीमध्ये 10 मेट्रिकट टनच्या आकाराच्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग सुरू केले. हळद करारासाठी मूळ वितरण केंद्र हे निझामबाद असून, अतिरिक्त केंद्र सांगली, इरोडे आणि बासमत येते सुरू करण्यात आली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती