‘ट्राय’ नव्या नियमावलीची अंमलबजावणी आजपासून सुरु

शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:18 IST)
केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने लागू केलेल्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. या नियमावलीला ‘ट्राय’ने महिनाभराची मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक ग्राहकांनी अजूनही टीव्ही वाहिन्यांची निवड केलेली नाही. अशा ग्राहकांना आजपासून केवळ निशुल्क (फ्री टू एअर) वाहिन्याच दिसू शकतील. टीव्ही वाहिन्यांची वाढती संख्या व त्यानुसार वाढत असलेले केबल, डीटीएचचे शुल्क यावर उतारा म्हणून ‘ट्राय’ने ही नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार ग्राहकांना त्यांना हव्या तितक्याच वाहिन्या निवडण्याचा अधिकार देण्यात आला असून तेवढय़ाच वाहिन्यांचे शुल्क त्यांना भरावे लागणार आहे.
 
दरम्यान, ज्या ग्राहकांनी वाहिन्यांची निवड आपल्या केबल वा डीटीएच ऑपरेटरना कळवलेली नाही, त्यांच्यासाठी टीव्ही प्रसारण बंद केले जाण्याची भीती व्य़क्त होत होती. मात्र, ‘ट्राय’ने तसे करण्यास मज्जाव केला आहे. सशुल्क वाहिन्यांची निवड न केलेल्यांना शुक्रवारपासून केवळ निशुल्क वाहिन्याच दिसतील. मात्र, त्यांनी लवकरात लवकर आपल्या केबल किंवा डीटीएच ऑपरेटरशी संपर्क साधून आपली निवड कळवावी, असे आवाहन ट्रायने केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती