'शिवशाही'च्या दरात विमान प्रवासाची संधी : 99 रुपयांत स्पाईसजेटचे उड्डाण

गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (13:10 IST)
स्पाईसजेट कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमान प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनुसार देशांतर्गत प्रवास 1.75 रुपये प्रतिकिमी तर आंतरराष्ट्रीय विानप्रवास 2.5 प्रतिकिमी ठेवण्यात आला आहे. पण, ठरावीक कालावधीसाठीच ही ऑफर देण्यात आली आहे. देशांतर्गत मार्गांवर सुरुवातीचे भाडे किमान 899 रुपये ठेवण्यात आले आहे. तर, आंतरराष्ट्रीय हामार्गावरील प्रवास 3699 रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे शिवशाही बसच्या दरात विमान प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
 
शिवशाही बसने प्रवास केल्यास प्रवाशांना जवळपास 1.60 पैसे प्रतिकिमी रुपये भाडे आकारले जाते. तर, स्पाईसजेटच्या या ऑफरनुसार 1.75 रुपये प्रतिकिमी भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे शिवशाहीच्या दरात विमान प्रवास करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, असेच म्हणता येईल. स्पाईसजेटच्या या तिकीट बुकिंगवर 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. एसबीआय क्रेडिटकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, एसबीआयची ऑफर आणि अतिरिक्त लाभ घेण्यासाठी स्पाईसजेटच्या www.spicejet.com या वेबसाइटवरुनच तिकिटाचे बुकिंग करावे लागणार आहे. तर यात्री प्रोमो कोड DDON25चा वापर केल्यास प्रीफर्ड सीट, जेवण आणि स्पाईट मॅक्सवर 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच स्पाईसजेट मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने बुकिंग केल्यास तिकीट दरांमध्ये 5 टक्के सवलत मिळेल. प्रवाशांना 5 टक्के ऑफरचा लाभ घेण्यासाठी DDON30हा प्रामोकोड वापरावा लागणार आहे.
 
मंगळवारपासून म्हणजेच 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रवाशांना तिकिटाचे बुकिंग करता येईल. तर, 25 सप्टेंबर 2019 पर्यंत या बुकिंगद्वारे प्रवास करता येणार आहे. या योजनेनुसार, दिल्ली ते कोईम्बतूर तिकीट दर 2899 रुपये आहे. तर मुंबई ते कोची तिकीट दर 1849 रुपये आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, कोलकाता ते ढाका आणि मदुराई ते दुबई प्रवास केल्यास 3699 रुपये भाडे आकारण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती