देशातील सर्वात मोठ्या एस.बी.आय. बँकेने केली ही सुविधा, होईल तुम्हाला त्रास

बुधवार, 12 डिसेंबर 2018 (16:34 IST)
देशातील सर्वात मोठी बँक म्हणवून घेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पुन्हा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने पुन्हा एक सुविधा बंद केली आहे. एसबीआयमध्ये तुमचे अथवा व्यापारी खातं असल्यास तुम्हालाही ही सुविधा बंद झाल्यानंतर अडचणींचा सामना तुम्हाला  करावा लागणार आहे. येत्या 12 डिसेंबरपासून एसबीआय जुना धनादेश स्वीकार करणार नाही. तुमचं जुनं चेकबुक त्यामुळे कालबाह्य होणार आहे. त्यामुळे मोठा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. जुनं चेकबुक बँकेत जमा करून नवीन चेकबुक घेण्यासाठी एसबीआयनं ग्राहकांना मेसेजही पाठवले असून, जुने चेकबुक स्वीकार केले जाणार नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडियानं आरबीआयच्या निर्देशानुसार याची अंमलबजावणी केलीय. आरबीआयनं तीन महिन्यांपूर्वीच बँकेला निर्देश दिले होते. 1 जानेवारी 2019पासून नॉन सीटीएस चेकबुकचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला पाहिजे असे सांगितले आहे. 

आरबीआयच्या निर्देशांचं पालन करतच एसबीआयनं जुने चेकबुक परत मागवले असून नवीन चेक घेवून जा असे सांगितले आहे. बँक स्वतःच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक जमा करून घेऊन त्यांना नवीन चेकबुक देणार आहे. यामुळे त्त्वरीत बँकेत जा आणि नवीन चेक बुक बदलून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती