SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम 18 सप्टेंबर पासून बदलतील

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (14:28 IST)
कोरोना काळात फसवणुकीचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) चे ठोस नियम असूनही फसवणूक केली जात आहे. हे लक्षात घेत भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. एसबीआयने सुरक्षित बँकिंग उपलब्ध करून देण्यासाठी नवीन एटीएम सर्व्हिस सुरू केली आहे. 
 
एसबीआयने वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम कॅश विड्रॉल सुविधेला 24 तास अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. 18 सप्टेंबर पासून हा नियमाची  देशभरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. वर्तमान काळात ही सुविधा रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
 
बँकेत ग्राहकांकडून देण्यात आलेल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल, ज्याद्वारे पैसे काढता येतील. अर्थात 18 सप्टेंबर पासून एसबीआयच्या एटीएमहून 10,000 रुपये किंवा याहून अधिक राशी काढल्यास दिवसाला देखील ओटीपीची गरज पडेल.
 
1 जानेवारी 2020 पासून एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य केलं होतं. एसबीआयने म्हटले आहे की ग्राहकांनी बँकेत आपला मोबाइल नंबर अपडेट करावा. 
 
या प्रकारे काढता येतील पैसे
प्रक्रियेप्रमाणे आपण पैसे काढत असाल तेव्हा एटीएम स्क्रीनवर रकमेसह ओटीपी स्क्रीन देखील दिसून येईल. ग्राहकांना ओटीपी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवण्यात येईल. याने फसवणुकीची शक्यता कमी होईल. हे लक्षात ठेवा की ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा केवळ एसबीआय एटीएमवर उपलब्ध आहे. इतर बँकांच्या एटीएममध्ये ही कार्यक्षमता नॅशनल फाइनेंशियल स्विच (NFS) मध्ये विकसित केलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती