एसबीआयने बचत खात्यावरील व्याज दर कमी केले

गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (12:05 IST)
एसबीआय बँकेने बचत खात्यावरील व्याज दर कमी केले आहेत. हे नवीन व्याज दर १ नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत. एसबीआय बचत खात्यात १ लाख रूपये जमा ठेवणाऱ्या ग्राहकांना ३.५० टक्के व्याज दर देत आहे. पण १ नोव्हेंबरपासून हे व्यज दर ३.२५ टक्के होणार आहे. त्याचप्रमाणे एसबीआयने रिटेल डिपॉजिटवर ०.१० टक्के आणि बल्क डिपॉजिटवर ०.३० टक्के दर घटवले आहेत.
 
एसबीआयने १० ऑक्टोबरपासून एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्के घट केली आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने ४ ऑक्टोबर रोजी ०.२५ टक्के व्याज दर घटवल्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे रेपो रेट ०.२५ टक्के घटवून ५.१५ टक्क्यांवर आलं आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती